Saturday 12 September 2015

दि. ३०/०९/२०१४ नंतर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत.........

सर्व नवीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ज्यांचा शिक्षण विभागातील रुजू दि. ३०/०९/२०१४ नंतर असेल अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्या Login ला New Recruitment चा Form उपलब्ध करून दिला आहे. 

ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती युडायस व शालार्थ या दोन्हीमध्येही दिसत नाही अशा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती सुद्धा संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांनी New Recruitment चा Form वापरून भरावी. 

वरील सर्व मान्यताप्राप्त शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती तपासून भरण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांची राहील.