रचनावादी उपक्रम

   *उपक्रमाचे नाव*
आरसा बोलतो,आरसा खेळतो
हेतू: 
खेळातून मनोरंजनात्मक अभ्यास करता येणे*_
साहित्य :    आरसा
व आवश्यक शब्द, चिञे, अंक..etc.
 *कृती*
 प्रथम मुलांचे गट करून घ्यावे.
गटाप्रमाणे पूरक साहित्य मुलांना देणे .
उदा ... अंक , शब्द , मुळाक्षरे ,
ABCD  abcd....चिञे..etc..
टिप.. वरील शक्य तेवढ्या साहित्याँचे उलट लिखाण करून घ्यावे.
(शाळा नायरी मराठी ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी ..श्री नारायण नानाराव शिंदे )
मला असे वाटते वर्गातील सर्व मुलांना नियोजित वेळेत आपआपल्या कुवत आणि गतिनुसार शिकण्याची संधी उपक्रमांमुळे मिळते.मुले स्वतःहून आवडीने तसेच कृतीतून शिकतात.*_
 आरसा मुलांना स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी ठेवावे.
आरशात प्रत्येक शब्द , चिञे. मुलांना दाखवावे.
मुलांना सुरूवातीला काही समजत नाही नेमक काय सुरू आहे ते पण या ठिकाणी शिक्षकांनी मार्गदर्शन करावे.
नंतर मुले आवडीने जादू झाली ! जादू झाली असे म्हणून आनंदाने ओरडायला सुरूवात करतील.
 हा उपक्रम घेत असताना कोणती अक्षरे सारखी दिसतात.कोणत्या अक्षरांचा क्रम बदलतो. हे लक्षात आणून दिले पाहिजे ,
अशा प्रकारे आरसा मुलांना बोलतोही आणि मुलांसोबत खेळतोही.
 वरील प्रमाणे अनेक घटक आपल्याला या प्रकारे घेता येतात.👇🏻👇🏻
उदा*..  डावा.. उजवा
पुढे ..मागे      वर.. खाली
उलटा..सुलटा...
उंच..लहान   
*अशा प्रकारे अनेक संकल्पना या उपक्रमातून स्पष्ट करता येतात.*
☄ शैक्षणिक साहित्य म्हणूनही आपण वापर करू शकतो. ( आरसा ) खर्च २० रु.( प्रत्येक गटासाठी) आणि कायम स्वरुपी.
*उपक्रम कसा वाटला हे आपण नक्कीच कळवा यात काही बदल आवश्यक असल्यासही कळवावे*

No comments:

Post a Comment